Friday, 6 January 2012

काही गोष्टी नकळतच घडून जातात....

काही गोष्टी नकळतच घडून जातात
आपल्या जीवनावर सर्वतोपरी अधिकार असतो आपला
तरी हि कुणीतरी नकळत येऊन न सांगता निघूनही जाते
मग आपल्याला या व्यक्तीची आठवण जीवनभर का येत राहते

काही क्षणांची असते ती साथ
पण जीवनभर का राहते मनात
हृदयावर का ताबा नसतो आपला
जर  पूर्ण शरीरावर असू शकतो तर

काही गोष्टी घडतच जातात
पण त्याचं काही वाटतच नाही
आणि काही गोष्टी क्षणभराच्या
पण वेदना राहतात अनंत काळ...

No comments:

Post a Comment