Friday, 6 January 2012

जीवनातले ते अविस्मरणीय क्षण!!!

जीवनातले ते अविस्मरणीय क्षण
रात्रीच्या अंधारातील तरी
आकाशातील चांदण्याप्रमाणे प्रकाशमान
नभातील तार्यांप्रमाणे आपले नसीब बदलवणारे बलवान

तोही एक असाच क्षण
नयनचक्षु बंद होते तरी पण
ती सुंदर मूर्ती नयनपुढे उभी
ती आवडती व्यक्ती दर्शन घडवी

मनी वाटते तिच्या सवे दूर गगनात उडावे
तिच्या कवेत शिरून सारे जग हिंडावे
आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत
फक्त तिच्यावर प्रेम करावे...

तो माझ्या शिवाय कोणाचाही नसावा
आणि मी त्याच्याशिवाय कुणाचीही नसावे
प्रेमातील राम शोधण्यात सारे जीवन जगावे
अखेर क्षणा पर्यंत सोबत असावे

ती मूर्ती पहाटेच्या प्रकाशात धूसर होत गेली
आणि माझी भेटण्याची आस तुटत गेली
कुणाच्यातरी हाकेने जाग आली
आणि माझी ती प्रेम कहाणी स्वप्नातील स्वप्नातच राहिली..

तरी वाटते कि कधी तरी ती व्यक्ती भेटावी
माझा हात धरून या अंधारमय जीवनमार्गात माझी साथ व्हावी...

                                                                                                                              - श्रद्धा

No comments:

Post a Comment