कविते आधी एक विचार आला .... प्रत्येकाच्या मनात असतात आठवनी, काही गोड काही कडू ... काही कालांतराने धूसर होणार्या तर काही वर्षानवर्षे खोल वर तश्याच राहणाऱ्या...
आठवण तुझी सतत सोबत देणारी
आठवण तुझी क्षणा क्षणाला सतावणारी
आठवण एक एक जुन्या क्षणांची
आठवण तुझी अन माझी
कधी वाटते पाटीवरच्या अक्षरांनप्रमाणे
आठवणीही पुसून टाकता आल्या असत्या
गेलेल्या काळासोबत त्याही निघून गेल्या असत्या
प्रयत्न करणे सोडून दिले आहे आता
त्या आठवनींना न आठवण्याचे
सोडून दिले आहे त्या क्षणांना
पुसून टाकण्याचा प्रयत्नात
तुझ्या शिवाय जगण्याचा क्षणांत
तुला आठवण्याचा कि विसरण्याचा
या गहन प्रश्नात राहण्यात...
- श्रद्धा
आठवण तुझी सतत सोबत देणारी
आठवण तुझी क्षणा क्षणाला सतावणारी
आठवण एक एक जुन्या क्षणांची
आठवण तुझी अन माझी
कधी वाटते पाटीवरच्या अक्षरांनप्रमाणे
आठवणीही पुसून टाकता आल्या असत्या
गेलेल्या काळासोबत त्याही निघून गेल्या असत्या
प्रयत्न करणे सोडून दिले आहे आता
त्या आठवनींना न आठवण्याचे
सोडून दिले आहे त्या क्षणांना
पुसून टाकण्याचा प्रयत्नात
तुझ्या शिवाय जगण्याचा क्षणांत
तुला आठवण्याचा कि विसरण्याचा
या गहन प्रश्नात राहण्यात...
- श्रद्धा
No comments:
Post a Comment